ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात राहुल गांधीचा प्रचार

यवतमाळ : वृत्तसंस्था

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राज्यात विकास कामांचे उदघाटन करीत असतांना आज दि.२८ रोजी यवतमाळमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. महिला मेळाव्याचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. हा मेगा इव्हेंट ४७ एकर पसरलेल्या विस्तीर्ण भागावर होणार असून, पंतप्रधानांचे भाषण दुपारी ४ वाजता होणार आहे.

या मेळाव्याच्या ठिकाणी ठेवलेल्या खुर्च्यांना राहुल गांधी याचे फोटो आणि स्कॅनर कोडही चिकटण्यात आला होता. त्यामुळे राज्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान व्यवस्थपकांच्या हे लक्षात आल्यानंतर खुर्च्यांवरील राहुल गांधींचा फोटो हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली असून सभा नेमकी मोदींची की राहुल गांधींची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या भागात नुकताच काँग्रेसची सभा झाली. त्यामुळे त्या कार्यक्रमासाठी राहुल गांधींचे फोटो खुर्च्यांवर चिकडवले होते. मात्र, ज्या ठेकेदाराने त्या खुर्च्या काँग्रेसच्या मेळाव्याला पुरवल्या, त्याच खुर्च्या भाजपच्या कार्यक्रमाला पाठवल्या. त्यामुले कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला असून याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे बुधवारी यवतमाळ शहराजवळीळ अनेक रस्त्यांवरील वाहतूक अन्यमार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे 12 वीची परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तसेच राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क संवर्गातील पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरीय लिपिक या पदांसाठी आज परीक्षा घेण्यात य़ेत आहेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!