पुणे : पुणे व आसपासच्या परिसरात काल रात्री झालेल्या पावसामुळं काही तासांतच पुण्याचे जनजीवन विस्कळीत करून टाकले. रस्त्यावर ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळं पुणेकरांचे अक्षरश: हाल-हाल झाले. त्यावरून पुणेकर संताप व्यक्त करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसनं हीच संधी साधून पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्याच्या वेगवेगळ्या भागांतील फोटो ट्वीट करत भारतीय जनता पक्षावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या ट्विट असे म्हंटले आहेत की, ‘पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेल्या २४ तासांत नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. मागची पाच वर्षे पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली आहे. ‘पुण्यासारख्या जागतिक पातळीवर महत्वाच्या असणाऱ्या शहरात असं चित्र निर्माण होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे. pic.twitter.com/fGJX1hPVwF
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 18, 2022