मुंबई : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असता नुकतेच राज ठाकरे यांनी शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक यांची भेट घेतली. शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावू नका, अशी मागणी या पालक आणि शिक्षकांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता या पालकांनी व्यक्त केली होती. यावर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला आहे. या शिक्षकांना निवडणुकीच्या कामात घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. असे असेल तर निवडणूक आयोग पाच वर्ष काय करते? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
निवडणूक आयोगाकडे पाच वर्ष काय काम असते? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. निवडणुका तोंडावर आल्या की घाईघाईने शिक्षकांना कामाला लावायचे, असे का केले जाते? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पहिली ते चौथीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला बोलावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. कोणत्याही शिक्षकाने निवडणुकीच्या कामावर रुजू होऊ नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे अशा शिक्षकांवर कोण शिस्तभंगाची कारवाई करतो, ते आम्ही पाहणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे भेटण्यासाठी जाणार आहोत. ते पाच वर्ष काय काम करतात? असा प्रश्न आम्ही त्यांना विचारणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ही काही देशातील पहिली निवडणूक नाही, त्यामुळे सर्व नियोजन का केले जात नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासाठी निवडणूक आयोगावरच कडक कारवाई करायला हवी, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. लवकरच आमचे नेते निवडणूक आयोगाशी चर्चा करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.