ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश :  युतीबाबत कोणीही बोलू नये !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्यावर आता दोन्ही ठाकरे बंधुंकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या. ज्यावरून काहींनी टीका केली तर काही दोघांच्याही एकत्र येण्याच्या चर्चांचे स्वागत केले. आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते आणि नेत्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

सध्या राज ठाकरे सध्या परदेशात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या प्रश्नाबाबत कोणीही बोलू नका. राज ठाकरेंनी संवेदनशील विषयावर बोलणं टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. काल संध्याकाळी पक्ष नेतृत्वाकडून मला सांगण्यात आलं की, विषय गंभीर आहे. या विषयावर आता कुणीही प्रवक्ता, नेता आणि कार्यकर्त्याने बोलू नये.

राजसाहेब 29 एप्रिलला परत येतील, तेव्हा तेच या विषयावर बोलतील. त्यांच्याशिवाय या विषयावर कोणी काही बोलणार नाही” असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सांगितल आहे. संवेदनशील विषयावर बोलणं टाळा असा थेट आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत “महाराष्ट्रापुढे आमच्यातील भांडण, वाद या क्षुल्लक गोष्टी आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं ही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही” असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून अटींसह सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. तसेच दोघांच्याही  एकत्र  येण्याने राजकीय समीकरणात कसे  बदल होणार? याबाबतही चर्चा सुरु झाल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!