अक्कलकोट : प्रतिनिधी
येथील पत्रकार राजेशकुमार जगताप यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मिरज येथे दिनांक १० एप्रिल रोजी संजय भोकर शैक्षणिक संकुलात डिजिटल मीडिया विभागाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी राजेशकुमार जगताप यांची सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यात आली.
या निवडीबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राजेशकुमार जगताप यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी आमदार गोपीचंद पडळकर ,जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे , राज्य संघटक संजय भोकरे , डिजिटल मिडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव आदी उपस्थित होते . मिरज येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मिडियाच्या राज्य अधिवेश निवडीचे पत्र देण्यात आले. या निवडी बद्दल राजेशकुमार जगताप यांचे पत्रकार नंदकुमार जगदाळे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य स्वामीराव गायकवाड, पत्रकार सैदप्पा इंगळे, पत्रकार मारुती बावडे , पत्रकार रमेश भंडारी ,मोहन बंदिछोडे आदींसह मान्यवरांनी अभिनंदन केले.