---Advertisement---

उदयनराजेंच्या वक्तव्याने राज्यात नव्या वादाला फुटणार तोंड !

By team
On: April 11, 2025 5:07 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात महापुरुषांच्या वक्तव्यामुळे वाद होत असतांना आता पुन्हा एकदा नवा वाद सुरु होणार असल्याची शक्यता आहे. स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली. महात्मा जोतिबा फुले यांनी एका दृष्टिकोनातून थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण केले. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सर्वप्रथम काेणी पाऊल उचलले असेल, तर ते थाेरले प्रतापसिंह महाराज हाेते, असा दावा शुक्रवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मुलींची पहिली शाळा फुले दाम्पत्य यांनी सुरू केली नाही, असे खासदार उदयनराजे यांनी सांगणे दुर्देवी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. सावित्रीबाई फुले यांनी प्रथम मुलींची आणि अस्पृश्य यांच्यासाठी शाळा सुरू केली, पण खरा इतिहास मोडतोड केला जात आहे. महात्मा फुले वाड्यामध्ये जाऊन त्यांचा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उदयनराजे यांना अभ्यास करून बोलण्याचा सल्ला दिला आहे.

खासदार उदयनराजे भोसले महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात फुलेवाडा येथे जात अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी साधलेल्या संवादामध्ये ते म्हणाले की, स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली. महात्मा जोतिबा फुले यांनी एका दृष्टीकोनातून थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण केले. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सर्वप्रथम काेणी पाऊल उचलले असेल, तर ते थाेरले प्रतापसिंह महाराज हाेते​​​​​​. त्यांनी स्वत:च्या सातारा येथील राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केली हाेती. विशेष म्हणजे याच राजवाड्यात देशाचे संविधान निर्माण करणारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील प्राथमिक शिक्षण झाले, असे दावाही त्यांनी केला.

उदयनराजे पुढे म्हणाले की, महात्मा फुले हे दूरदर्शी नेतृत्व हाेते. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून सर्व समाज सुधारण्याचे कामाकरिता आयुष्य खर्ची केले. जे युगपुरुष हाेऊन गेले त्यांचे स्मारक जतन करणे आपले र्कतव्य आहे. त्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळून सदर विचारांचे त्यांनी पालन करून ते आचरणात आणावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चे आयुष्यभर लाेकांकरिता व राज्यकारभारात लाेकांचा सक्रिय सहभाग असावा यादृष्टीने काम केले.

महापुरुष यांच्याबाबत सातत्याने अनुदगार काढले जातात हे दुर्देव आहे. महापुरुषांचा अपमान होऊ नये. याबाबत कठाेर कारवाई कायद्याने झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर दर्जेदार शासनमान्य ग्रंथ अद्याप प्रकाशित झालेला नाही. अनेकजण कल्पनेतून कादंबरी लिहितात. त्यावर एखादा चित्रपट निघताे आणि वाद निर्माण हाेतात. ऐतिहासिक गाेष्टी संर्दभ तपासणीसाठी एक तज्ञांचे सेन्साॅर बाेर्ड असावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!