ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राजेशकुमार जगताप आचार्य जांभेकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

अक्कलकोट, वृत्तसंस्था  

 

येथील राजेशकुमार जगताप यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.हा सन्मान महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघ मुंबई आणि पत्रकार हल्ला कृती समितीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त पिंपरीतील ग. दि. माडगूळकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देण्यात आला.

या सोहळ्यात  जगताप यांचा सन्मान एबीपी ‘माझा’च्या संपादक सरिता कौशीक, सिने अभिनेते किरण माने आणि आमदार अमित गोरखे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, संपादक सचिन जवळकोटे, उद्योजक संजय कलाटे, यशवंत भोसले, वसंत मुंडे, विश्वासराव आरोटे, संजय भोकरे, इरफान भाई सय्यद यांच्या हस्ते करण्यात आला.   यावेळी वैभव विधाटे, नितीन शिंदे प्रदेश उपाध्यक्ष , अतुल क्षीरसागर शहराध्यक्ष, उपाध्यक्ष महादेव मासाळ , पराग कुंकूलोळ माजी शहराध्यक्ष, गोविंद वाकडे प्रदेशाध्यक्ष पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मनीषा थोरात महिला शहर अध्यक्षा  पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती , सचिन चपळगावकर, व पत्रकार संघ सदस्य व गौतम वाघमारे ,संतोषी वाघमारे, सागर वाघमारे , आनंद चौगुले उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण २०२५ पुरस्काराने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये ग्रामीण, दुर्गम भागातील तसेच शहरातील अशा वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा समावेश होता.  मान्यवरांचे स्वागत नितीन शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन अश्विनी सातव यांनी केले व आभार अतुल क्षीरसागर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!