ध्यास विश्वसार्ह बातमीचा

 “या” मागणीसाठी फकीरा संघटनेकडून राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन

मुरुम दि.९ : लोहरा तालुक्यातील दस्तापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर आज फकीरा ब्रिगेडकडून रस्ता रोखून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर निवेदन देण्यात आले.

या निवेदनात दस्तापूर येथील गट नं. ९८ मधील २५ आर जमिनीच्या हद्द खुणा करून देण्यात याव्यात, राहत असलेल्या जागेचा कबाला मिळवून द्यावा. तात्काळ या मागणीचा विचार करण्यात यावा अन्यथा १ जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रात फकीरा ब्रिगेडच्या वतीने राज्यातील दलित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघटना विविध मार्गाने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे.

या आंदोलनाप्रसंगी कुठला अनुचित प्रकार घडल्यास संपूर्णपणे प्रशासनाची जबाबदारी राहील असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार उपलब्ध नसल्याने पो. कॉ.अमर जाधव, हे.पो.कॉ.यशवंत सगर यांच्याकडे सदर निवेदन देऊन रस्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले.

यावेळी फकीरा ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष श्रीरंग सरवदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पार्वती झुंजारे, जिल्हा उपाध्यक्ष नागिनी थोरात, मराठवाडा संघटक संजय सरवदे, तालुकाध्यक्ष नागिनी काळे, मिराबाई, निकम, सुरेखा सरवदे, भारताबाई लोंढे, अलकाबाई लोंढे, ज्ञानबा काळे, इंदुबाई काळे, मधुबाई गायकवाड, नटराज गायकवाड, दामोदर कांबळे, रवींद्र झुंजारे, प्रकाश लोंढे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!