---Advertisement---

RBI ने आणखी एका सहकारी बॅंकेचा परवाना केला रद्द; ठेवीदारांमध्ये खळबळ

On: January 12, 2021 5:19 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राज्यातील आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द केला  आहे. RBI ने सोमवारी उस्मानाबाद, महाराष्ट्रातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला. बँकेच्या या कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

रिझर्व्ह बँक म्हणाले की, बँक सध्याच्या ठेवीदारांचे संपूर्ण पैसे सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार परत करू शकणार नाही. म्हणूनच त्यांचा परवाना रद्द  केला जात आहे. या सहकारी बँकेचा परवाना रद्द झाल्यामुळे आणि लिक्विडेशनची प्रक्रिया सुरु झाल्याने वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रियाही सुरू केली जाईल, असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.

सोमवारी कामकाज संपल्यानंतर या सहकारी बँकेचा परवाना रद्द झाल्याचे मानले जाईल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. यानंतर ही सहकारी बँक ऑपरेट करू शकणार नाही. ठेवीदार लिक्विडेशननंतर डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून पाच लाख रुपयांपर्यंतचे डिपॉझिट मिळण्यास पात्र असेल. आजपासून या बँकेला व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!