---Advertisement---

अक्कलकोट शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी मुबारक कोरबु यांची फेर निवड

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट,दि.८ : अक्कलकोट येथील सामाजिक कार्यकर्ते मुबारक कोरबु यांची अक्कलकोट शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली आहे. सामाजिक कार्य व पक्ष बांधणी लक्षात घेऊन फेर निवड करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी,जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे हात बळकट करण्यासाठी अक्कलकोट शहर युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली आहे.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोलराजे भोसले, नगरसेवक तथा देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, विरोध पक्ष नेते अशपाक बळोरगी,नगरसेवक सद्दाम शेरीकर, महिला तालुकाध्यक्ष शीतल म्हेत्रे,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहराध्यक्ष बसवराज अळोळळी आदींनी अभिनंदन केले आहे. सर्वांना विश्वासात घेऊन युवकांची फळी शहरामध्ये करून अक्कलकोट नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचे कोरबू यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!