ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना दिलासा ! आयएनएस विक्रांत अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चिट

मुंबई : आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेत तब्बल ५३ हजार कोटी रुपये जमा करत या रकमेचा अपहार केल्या प्रकरणी भाजपनेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा माजी नगरसेवक नील सोमय्या यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा सापडला नसल्या मुंबई पोलिसांनी कोर्टाला सांगितले असून यामुळे या प्रकरणातून त्यांची सुटका होणार आहे.

भारतीय नौदलाची पहिली युद्ध नौका आणि १९७१ च्या युद्धात महत्वाची कामगिरी करणाऱ्या आयएनएस विक्रांत निवृत झाल्यावर ती भंगारात काढण्याऐवजी तिची डागडूजी करण्यात यावी आणि तिचे संग्रहालय करावे यासाठी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी मुंबई नागरिकांकडून लोकवर्गणी जमा केली होती. दोघांनीही तब्बल ५७ कोटी रुपयांचा निधी गोळा केला होता. मात्र, ही रक्कम दोघा पितापुत्रांनी लाटली असल्याचा आरोप माजी सैनिक बबन भोसले यांनी गेल्या वर्षी केला होता. त्यानुसार ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. महाविकास आघाडीने या वरुन भाजपवर निशाना साधला होता.

दरम्यान, सोमय्या यांना या प्रकरणी अटक देखील होणार होती. मात्र, त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यावर मुंबई उच्च न्यायालयात जात त्यांनी याचिका दाखल केली होती. सोमय्या यांनी केवळ ११ हजार २२४ हजार रुपये जमा केल्याचा दावा सोमय्या यांच्या वकिलांनी केला होता. याचा तपशील देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.याचा केवळ अंदाज सांगता येईल तपशील देता येणार नाही असे त्यांनी सांगितले होते.

या बाबत लेखी निर्देश हायकोर्टाने मुंबई पोलिसांना दिले. मात्र, याबाबत माहिती पोलीसांना कोर्टात सादर करता न आल्याने सोमय्या यांना दिलासा मिळाला होता. आताही या बाबत ठोस पुरावे मिळाले नसल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!