ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट नगर परिषदेकडे आता रेस्क्यू व्हेईकल दाखल

संकट काळात होणार मदत

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट शहर आणि परिसरात आपत्कालीन मदतीसाठी आता नगरपरिषदेकडून रेस्क्यू व्हेईकल उपलब्ध झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या अग्निशामन संचालनालयाकडून ही व्हेईकल मिळाली असून याद्वारे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून ही मंजूर झाली आहे. अक्कलकोट ब वर्गाची नगरपरिषद असल्याने या व्हेरिकलची अत्यंत गरज होती. ही इमर्जन्सी व्हॅन आहे. एखादा अपघात झाला तर बऱ्याच वेळा गाडीतून अपघातग्रस्त व्यक्तीला किंवा मृतदेहाला काढणे खूप अडचणीचे होते.

गाडीचे पार्ट कापून त्या व्यक्तीला या व्हेईकलद्वारे बाहेर काढता येऊ शकते. त्याला कटर आहेत. हायड्रोलिक जॅक आहे. आग विझवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा बसवण्यात आली आहे.काम करत असताना एखाद्या झाडाचा अडथळा होत असेल तर झाड तोडण्यासाठी सुद्धा वेगळी सिस्टीम आहे. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त व्यक्तीला नेण्यासाठी स्ट्रेचरची सुद्धा या गाडीमध्ये सोय आहे. रात्रीच्या वेळी एखाद्या वेळी लाईट गेली तर मोठ्या उंचीवर जाऊन लागणाऱ्या लाईट या गाडीला आहेत. जेणेकरून मदत कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ शकणार नाही. पेट्रोल पंपावर जर एखादी आग लागली तर त्यासाठी फोम सिस्टीम सुद्धा देण्यात आली आहे. समोरासमोर अपघात होऊन जर एखादे वाहन अडकले तर अडकलेली गाडी दोन टनापर्यंत क्रेन द्वारे त्याला ओढून सुद्धा नेता येऊ शकते. कुठेही संकटाच्या काळामध्ये त्या रेस्क्यू व्हेईकलची मदत नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

अक्कलकोट नगर परिषदेकडे ही व्हेईकल आता २४ तास उपलब्ध राहील. नगरपरिषद तर यासाठी सज्ज आहेत पण यासाठी नागरिकांना जरी मदत लागली तर आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.याची जबाबदारी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आलेली आहे.या पुढच्या काळात एखादी अशी जर घटना घडली तर या व्हेईकलद्वारे निश्चितच दिलासा मिळेल, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group