रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये केली वाढ, कर्ज आणि EMI चा बोजा वाढणार
दिल्ली : दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे जनता बेजार झाली आहे. त्यातच आता कर्जाचा बोजा वाढणार आहे. कारण ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर कर्ज आणि EMI चा बोजा वाढणार आहे.
Post Monetary Policy Press Conference by Shri Shaktikanta Das, RBI Governor- December 07, 2022 https://t.co/Xbv7pOXQic
— ReserveBankOfIndia (@RBI) December 7, 2022
RBI ने 35 बेसिस पॉईंटने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. 5 ते 7 तीन दिवस मॉनिटरी पॉलिसीवर बैठक झाली. यावेळी 35 बेसिस पॉईंटने रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीने 35 बीपीएसने वाढवून 6.25% केली आहे. पॉलिसी रेट आता ऑगस्ट 2018 नंतर सर्वोच्च स्तरावर असल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली आहे.
याचा सर्वसामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे. EMI, होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन महाग होणार आहेत. जे नवीन लोन घेणार त्यांना वाढलेल्या दराने लोन घ्यावं लागेल. ज्यांचा EMI सुरू आहे त्यांचा EMI वाढणार आहे.
शक्तीकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशिया-युक्रेन युद्धाचा आर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम महागाई मोठ्या प्रमाणात जगभरात वाढली आहे. इंपोर्टवर मोठा परिणाम झाला आहे. हवामानातील बदलाचा धानावर मोठा परिणाम भारताची आर्थिक स्थिती सध्या बऱ्यापैकी स्थिर महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी RBI ने आतापर्यंत चारवेळे रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. ही रेपो रेटमधील पाचव्यांदा केलेली वाढ आहे. त्यामुळे EMI आणि लोन खूप जास्त महाग झालं आहे. रिझर्व्ह बँकेने यंदा मे महिन्यापासून रेपो दरात 1.90 टक्के वाढ केली आहे. जानेवारीपासून महागाई 6 टक्क्यांच्या समाधानकारक पातळीच्या वर राहिली आहे.