मुंबई, दि. १९:- न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा आज सकाळी राजभवन येथे राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथविधी झाला.
यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.






