ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवपुरीला भेट देत आमदार कल्याणशेट्टी यांनी केले अग्निहोत्र

संस्थांनतर्फे डॉ.राजीमवाले यांनी केला सपत्निक सत्कार

अक्कलकोट, वृत्तसंस्था 

 

अक्कलकोटचे नवनिर्वाचित आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शिवपुरीस भेट देऊन परमसद्गुरू श्री गजानन महाराजांचे आशीर्वाद घेतले. यावेळी संस्थांनच्यावतीने त्यांचा सपत्निक विश्व फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले व डॉ. गिरीजा राजीमवाले यांनी सत्कार केला. आमदार कल्याणशेट्टी यांनी शिवपुरीला भेट दिल्याबद्दल डॉ.राजीमवाले यांनी समाधान व्यक्त केले.

आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, शिवपुरी संस्थानला खूप मोठी परंपरा आहे. ती परंपरा डॉ. राजीमवाले  हे चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत. हे काम वैश्विक आहे आणि ते सर्वांसाठी आहे मानवी जीवनासाठी सुख शांती आणि समृद्धीसाठी अग्निहोत्र हा एकमेव उपाय आहे. प्रत्येकाने अनुकरण करण्यासारखी ही गोष्ट आहे आणि ही बाब अक्कलकोटमधून संपूर्ण विश्वाला जाते. याचा आम्हाला देखील मोठा अभिमान आहे असेही ते म्हणाले.

यावेळी डॉ.गिरीजा राजीमवाले यांनी अग्निहोत्र बद्दलची माहिती सर्वांना दिली. आमदार कल्याणशेट्टी यांनी  स्वतः याप्रसंगी अग्निहोत्र देखील केले. यावेळी सेक्रेटरी अण्णा वाले, डॉ. गणेश थिटे,धनंजय वाळुंजकर, पवन कुलकर्णी, वक्रतुंड औरंगाबादकर, संजय अग्रवाल, गायत्री पारखे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!