ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘मतदानाला जाताना सिलिंडरला नमस्कार करुन जा’ ; शरद पवार

माढा : वृत्तसंस्था

देशात लोकसभा निवडणुकीसाठी आता राज्यातील अनेक उमेदवार अर्ज भरण्याची धावपळ सुरु असतांना आता शरद पवारांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

‘मतदानाला जाताना घरातील गॅस सिलिंडरला नमस्कार करुन जा’ असे आवाहन करणारे पंतप्रमधान नरेंद्र मोदी यांचे 2014 मधील भाषण शरद पवार यांनी ऐकवले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेत शरद पवार बोलत होते.सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये दिलेला एकही शब्द पाळला नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये दिलेला एकही शब्द पाळला नाही. सामान्य लोकांची महागाईतून सुटका केली नाही आणि शिव्या आम्हाला घालत आहात? अहो राज्य तुमच्याकडे, केंद्र तुमच्याकडे, आम्ही विरोधी पक्षात आणि शिव्या आम्हालाच घालता का? असा प्रश्नही शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. नरेंद्र मोदी पुढे काय करणार हे सांगत आहे. पण मराठीमध्ये एक म्हण आहे. ‘लबाडा घरचे आमंत्रण, जेवल्याशिवाय खरे नाही’ असेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

2014 मध्ये पेट्रोलची किंमत 71 रुपये होती. 2014 च्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलची किंमत निम्म्यावर आणतो, असे आश्वासन दिले होते. मात्र, आज पेट्रोलची किंमत 107 रुपये लिटर झाली आहे. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था संकटात गेली असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. आमच्या सरकारच्या काळात गॅस सिलिंडरची किंमत 410 रुपये होती. आता ती किंमत 1160 रुपये आहे. सगळ्याच किमती वाढल्या असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!