ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संगणक परिचालकांचा प्रश्‍न विधानसभेत मांडणार : आमदार सचिन कल्याणशेट्टी

 

मुंबई,दि.४ : राज्य संगणक परिचालक संघटनेच्या विविध मागण्यांचा प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनात मांडणार असल्याचे भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
मुंबईतील आमदार निवासात अक्कलकोट तालुका संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार राठोड व अन्य पदाधिकारी यांनी आमदार कल्ल्याणशेट्टी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी आझाद मैदानात धरणे आंदोलनास बसलेल्या परिचालकावर परवा रात्री पावणे अकरा वाजता पोलिसांनी बळाचा वापर करून अमानुषपणे मारहाण केलेल्या घटनेचा आमदार कल्ल्याणशेट्टी यांनी तीव्र शब्दात निषेध केला.२२ फेब्रुवारी २०२१ पासून मुंबईत आझाद मैदानावर राज्य संघटनेतर्फे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. किमान वेतन मिळावे किंवा नवीन आकृतीबंधानुसार ग्रामपंचायतकडे वर्ग करून कर्मचारी दर्जा देणे, आयटी महामंडळात सामावून घेणे या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे.शासन पोलीस बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या दाबावाला बळी न पडता हजारो संगणक परिचालक मुंबई मध्ये गेले अकरा दिवस न्यायाच्या प्रतीक्षेत ठाण मांडून बसले आहेत. मात्र शासन दखल घेत नसल्याने संगणक परिचालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.अक्कलकोट तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार राठोड, सचिन माडयाळ , निंगराज व्हनशेट्टी, भागेश दुधनी, विठोबा बिराजदार, आणि राजेंद्र पवार या संगणक परिचालक पदाधिकारी यांनी आज रात्री आमदार निवासात भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले आणि अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.यावेळी आमदार कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यातील आंदोलनास उपस्थित संगणक परिचालकांसोबत भोजन केले आणि सर्वांची आमदार निवासात राहण्याची सोय केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!