---Advertisement---

“.. तर मतदारांना फोन पे करा” संतोष बांगरांचे खळबळजनक वक्तव्य

By team
On: October 19, 2024 12:54 PM
Follow Us:
---Advertisement---

 

हिंगोली वृत्तसंस्था

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे नेहमी चर्चेत असतात. निवडणुकीच्या पाश्वभूमीवर त्यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. बाहेरगावी असलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट दोन-तीन दिवसांमध्ये द्यावी. त्यांना सांगा गाड्या करा, गाड्यांसाठी जे काही लागतं ते त्यांना फोन पे करा, त्यांना सांगा येण्या-जाण्याचे जे काही लागते ते आम्हाला सांगा असे हिंगोलीच्या कळमनुरी येथे आमदार संतोष बांगर यांनी एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे.

उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच आमदार संतोष बागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख फिक्स करण्यात आली आहे. येत्या 24 तारखेला आमदार संतोष बांगर कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

संतोष बांगर हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. शिवसेनेते फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. ते सातत्यानं त्यांच्या वेगवेगळ्या वक्त्व्यांमुळं चर्चेत असतात. अशातच आता त्यांनी बाहेरगावच्या मतदारांना आणण्यासाठी फोन पे करण्याची भषा केली आहे. त्यामुळं सर्वत्र त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे. मतदारांना आमिष दाखवण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!