कोल्हापूर वृत्तसंस्था
आज दुपारी 3 वाजेपर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये महाविकास आघाडीच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मधुरीमाराजे यांचाही समावेश आहे. मधुरीमाराजे यांच्या उमेदवारीवरुन फार नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. पक्षातील वरिष्ठांनी राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. पण ऐनवेळी त्यांनी माघार घेतली आणि काँगेसची नाचक्की झाली. यामुळे सतेज पाटील चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. ‘दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग’, अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयातून ते निघून गेले.
विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यांच्या जागी काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. पण नंतर सूत्रं फिरली आणि पक्षातील वरिष्ठांनी प्रसाद लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. मधुरीमाराजे यांनी एबी फॉर्म देण्यात आला होता. यानंतर त्यांनी अर्जदेखील दाखल केला. मात्र यामुळे राजेश लाटकर नाराज झाले होते आणि त्यांन अपक्ष अर्ज दाखल केला होता.