ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होण्यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्वाचे !

सहायक संचालक मनिषा फुले यांचे मत

अक्कलकोट : प्रतिनिधी

क्रिडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व विज्ञान प्रदर्शन यामधून विदयार्थ्यांचा शारिरीक,बौध्दिक व व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक मनिषा फुले यांनी केले.

सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूर व आश्रमशाळा नागनळळी यांच्या संयुक्त विदयमाने पूर्व विभागाचे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी विज्ञान प्रदर्शन व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पाडला.त्यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी संस्थेचे सचिव जावेद पटेल, प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शितल म्हेत्रे,प्रभाकर डमरे,महेश सरवदे ,जब्बार शेख,प्रा.शिवाजी धडके,म.रफी मनियार,मोहन चव्हाण, विलास पाटील,प्राचार्य इस्माईल मुजावर,मुख्याध्यापक रईस शेख उपस्थित होते.या कार्यक्रमास पत्रकार मारुती बावडे, अल्ताफ पटेल,स्वामीराव गायकवाड,रमेश भंडाराी, राजू जगताप,नंदकुमार जगदाळे हे उपस्थित होते.या सर्वांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुण्याचे स्वागत प्रशालेच्या विदयार्थी व विदयार्थीनीनी पुष्पगुच्छ देवून केले.मान्यवरांनी वैज्ञानिक उपकरणांची पाहणी केली व विदयार्थ्यांचे कौतुक केले.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन दिप प्रज्वलन करण्यात आले.तदनंतर संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात म्हेत्रे यांनी विदयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करुन शाळेच्या विदयार्थ्यांना मिळणारे सोयी सुविधा विषयी गौरवोदगार काढले. स्काउट गाईड,एन.एस.एस.,एन.सी.सी. हे उपक्रम आश्रमशाळेत चालू करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्याचे असल्याचे फुले यांनी सांगितले.यावेळी विज्ञान प्रदर्शन व चित्रकला स्पर्धेत विभागानुसार प्रथम,व्दितीय,तृतीय व उत्तेजनार्थ विदयार्थ्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व रोख रक्कम वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संस्थेच्यावतीने प्रदान करण्यात आले.प्रशालेतील संगीत शिक्षक रुद्राक्ष वैरागकर यांनी भक्तीगीत सादर करुन पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.रवींद्र नवले, प्रा.अमोल पाटील,बदिउजमा पटेल,प्रकाश सोनटक्के, प्रा.शिवाजी चव्हाण,शुभांगी मिठारी, वसीम शेख,राजेंद्र साखरे,समीर शेख, बसवराज बिराजदार,दिगंबर नांदवटे, संजय कवटगी,मल्लिनाथ चिंचोळी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक शंभूलिंग बशेट्टी यांनी केले सूत्रसंचालन मोहन गुरव यांनी तर आभार मनोज जगताप यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!