धोंडपा नंदे यांना स्व.पत्रकार महेश जांभूळकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान
कर्तव्य फाउंडेशन आयोजित कर्तव्य गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील वागदरी गावचे सामाजिक कार्यकर्ते वृत्तपत्र लेखक,पत्रकार गावगाथा दिवाळी अंकाचे संपादक धोंडपा नंदे यांना पुणे सामाजिक संस्था कर्तव्य फाउंडेशन वतीने यंदाचा स्व.पत्रकार महेश जांभूळकर आदर्श पत्रकार पुरस्कार गौरविण्यात आले. धोडपा नंदे गेल्या वीस वर्षांपासून सोलापूर व पुणे येथे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहेत.विविध वृत्तपत्र दैनिकातून सातत्याने लेखन करत असून आतापर्यंत जवळपास पाच हजार लेख प्रकाशित झाले आहेत.
तसेच पुण्यात त्याच्या विविध समस्या वर लेखन प्रसिद्ध झाल्यावर प्रशासन ने दखल घेऊन तात्काळ कामं केली आहेत.सोशल मिडिया वर सातत्याने विविध विषयांवर लेख करून विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचा काम करतं आहेत.गेल्या दोन वर्षांपासून गावगाथा दिवाळी अंकाचे यशस्वी प्रकाशन करूंन गावगाथा च्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती रूढी परंपराचे दर्शन अंकामध्ये करून देत आहेत, गावगाथा ग्रामीण भागातील लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिली आहे.या सगळ्यांचा विचार करून पुणे येथील सामाजिक संस्था कर्तव्य फाउंडेशन त्यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. कर्तव्य फाऊंडेशन च्यावतीने विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात येतात त्याचे संस्थापक अध्यक्ष विकास भांबुरे आदर्श कार्यकर्ते दरवर्षी असा आगळं वेगळं कार्यक्रम घेऊन विविध क्षेत्रातील लोकांना कौतुकाची थाप देऊन सन्मान करतात यंदाही कर्तव्य फाउंडेशन आयोजित कर्तव्य गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला, यावेळेस प्रमुख अतिथी भिमराव पाटोळे, राम बांगड, प्रा.डाॅ.विलास आढाव, दिलीप गिरमकर, मोहन दुधाणे, संदीप भोसले, मन्सूर शेख, आयोजक विकास भांबुरे, अशोक देशमुख, सचिन कांबळे, रवी पवार आदी उपस्थित होते.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात मुक्त पत्रकार धोंडप्पा नंदे (स्व.पत्रकार महेश जांभूळकर आदर्श पत्रकार पुरस्कार), गिर्यारोहक सुनील पिसाळ (एव्हरेस्टवीर स्व. स्वप्नील गरड साहसी गिर्यारोहक पुरस्कार), समाजसेवक कुमार शिंदे (स्व.रणजित परदेशी स्मृती आदर्श कार्यकर्ता पुरस्कार), कर्नल सुरेश पाटील (पाणी मित्र पुरस्कार), शिरीष केदारी (स्व.अरविंद जाधव स्मृती आदर्श जेष्ठ नागरिक पुरस्कार), कवी नरेश चव्हाण (लेखक स्व.धर्मपाल कांबळे स्मृती आदर्श साहित्यिक पुरस्कार), डाॅ.बंटी धर्मा (आदर्श डाॅक्टर पुरस्कार), पोलीस हवालदार रहीशा शेख (आदर्श पोलीस पुरस्कार), अल-खैर वेलफेअर फाउंडेशन (आदर्श सामाजिक संस्था) व सहा.कार्य.अभियंता विजय चव्हाण (आदर्श कॅन्टोन्मेंट अधिकारी पुरस्कार) आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच सी.ए.अरविंद खंडेलवाल, सौ.माधुरी गिरमकर, पाॅवरलिफ्टर शाम साहनी, सौ.आरती हिरवे व महेंद्र भोज यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील बाथम, विजय भोसले, महेंद्र कांबळे, मोहीत शहा, समीर सय्यद आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास भांबुरे यांनी केले तर दिलीप भिकुले यांनी सूत्रसंचालन पार पाडले.