---Advertisement---

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळे निधन

Follow Us:
---Advertisement---

 

दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचं आज करोनामुळं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. करोनाच्या नियमानुसार दिल्लीमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मागील काही दिवसांपासून ते दिल्लीतच वास्तव्यास होते. दिलीप गांधी यांनी अलीकडेच कोरोना चाचणी करून घेतली होती. ती चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते मंगळवारी रुग्णालयात दाखल झाले होते. तिथं दुपारपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!