ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रोहित पवारांचे गंभीर आरोप : भाजप कार्यकर्त्यांनी स्ट्रॉग रुममध्ये घुसण्याचा केला प्रयत्न

मुंबई : वृत्तसंस्था

विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या काही तासात जाहीर होणार असून त्यापूर्वी राज्यातील शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी एक खळबळजनक आरोप केल्याने राज्याचे लक्ष लागून आहे. भाजपच्या सुमारे 25-30 कार्यकर्त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी X वर पोस्ट करत केला आहे.

दरम्यान आमदार रोहित पवार म्हणाले की, सीआरपीएफ आणि माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भितीने सुरु असलेली गुंडागर्दी आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, भाजपच्या सुमारे 25-30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु माझे कार्यकर्ते आणि CRPF च्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळत हा प्रयत्न हाणून पाडल्याबाबत त्यांचे आभार! याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपच्या दबावाखाली असलेल्या स्थानिक पोलिस प्रशासनाने मात्र सहकार्य करण्याऐवजी त्रास देण्याचीच भूमिका घेतली, याची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घ्यावी. भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भितीने सुरु असलेली गुंडागर्दी आहे… पण पुढील चोवीस तासातच कर्जत-जामखेडच्या जनतेकडून लोकशाही मार्गाने या गुंडगिरीला चाप बसल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रोहित पवार यांनी 1,35,824 मतांनी विजय मिळवला आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा)चे प्रा. राम शंकर शिंदे यांचा 43,347 मतांच्या फरकाने पराभव केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!