ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : नागपूरातील हॉटेलात सुरु होता देहव्यवसाय !

नागपूर : वृत्तसंस्था

राज्यातील नागपूर शहर गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारीचे ठिकाण बनत असतांना आता एका ओयो हॉटेलमध्ये तरुणींकडून देहव्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले आहे. या घटनेने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या हॉटेलमध्ये हुक्का सुद्धा ग्राहकांना पुरवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना या संबंधीची माहिती मिळताच या हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी काही आरोपींना देखील यावेळी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील गिट्टीखदान भागात एका हॉटेलमध्ये तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. तसेच या हॉटेलमध्ये ग्राहकांना हुक्काची देखील सुविधा पुरवली जात होती. हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी या हॉटेलवर धाड टाकत कारवाई केली आहे. यातून नागपूरमध्ये मोठे सेक्स रॅकेट सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत काही तरुणींची सुटका करण्यात आली आहे, तसेच काही आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.

नागपूर शहरतील गिट्टीखदान भागात एक ओयो हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आर्थिक फायद्यासाठी तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी तातडीने या हॉटेलवर धाड टाकत कारवाई केली. या कारवाईत एकूण दोन आरोपींना नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. कारवाईत दोन आरोपींनी मात्र पळ काढला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. चेतन आकोले आणि युगांत दुर्गे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यावेळी काही तरुणींची देखील सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकल्यानंतर तेथे चार पीडित मुलींकडून जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या चार मुलींची आरोपींच्या ताब्यातून सुटका केली. सदर हॉटेलमध्ये ग्राहकांना हुक्का पिण्यासाठीही पुरवठा केला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मोबाईल फोन, हुक्का पॉट आणि इतर साहित्य असा एकूण 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोन आरोपी पळून गेले असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोण-कौन सहभागी आहेत, याचा तपासही पोलिस करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group