परळी वृत्तसंस्था
राज्यात जोरदार प्रचारसभा सुरु असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. बीडमध्ये शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची परळी मतदारसंघात सभा पार पडली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचा चांगलाच समाचार घेतला.
‘बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवावी आणि हा प्रश्न सुटावे यासाठी आग्रही आहे. आज पक्ष संकटात आहे. राष्ट्रवादी फोडण्यामध्ये दोन-तीन लोक होते, हे मी सांगायची गरज नाही. इथलं राजकारण सुधारण्यासाठी काम करणार आहे’, असं म्हणत शरद पवार यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता टीकास्त्र सोडलं. तसंच, ‘धनंजय मुंडे यांना पक्षात घेतलं संघटनेची जबाबदारी दिली. विरोधी पक्षनेतेपद, दिलं मंत्रिपद दिलं. दुर्दैवाने परिस्थिती बदलली’ असंही पवारांनी आवर्जून सांगितलं.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. बीडमध्ये शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची परळी मतदारसंघात सभा पार पडली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचा चांगलाच समाचार घेतला.
‘बऱ्याच दिवसांनी परळीत आलोय. परळीतील रघुनाथराव हे माझे जीवाभावाचे सहकारी होते. आज महाराष्ट्राला वीज देण्याचं काम परळीनं केलं. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी परळीचं विद्युत केंद्र महत्त्वाचं आहे. पण परळीत गुंडगिरी वाढली. इथं धंदा करणे अवघड आहे. एका प्रकारची गुंडगिरी आणि दादागिरी सुरू आहे,’
‘परळीतील गुंडगिरी आणि दादागिरीचं हे चित्र बदलाची भूमिका घेणं गरजेचं आहे. काही लोकांना राजकीय संकटाच्या काळात त्यावेळी माझ्याकडून मदत झाली. पंडित अण्णा मुंडे आले, ‘आम्ही अडचणीत आलोय, तुम्ही मदत करा’ म्हणाले. धनंजय मुंडे यांना पक्षात घेतलं संघटनेची जबाबदारी दिली. विरोधी पक्षनेतेपद, दिलं मंत्रिपद दिलं. दुर्दैवाने परिस्थिती बदलली,’ असं म्हणत शरद पवारांनी खंतही व्यक्त केली.
‘जिल्ह्यात अनेक लोकांचे अनेक प्रश्न आहेत. लोकांना त्रास देणं थांबवा यासाठी लोकसभेत बजरंग सोनवणे यांना निवडून दिले याचा आनंद आहे. या ठिकाणी राजेसाहेब देशमुख सारखा उमेदवार आम्हाला मिळाला. बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवावी आणि हा प्रश्न सुटावे यासाठी आग्रही आहे. आज पक्ष संकटात आहे. राष्ट्रवादी फोडण्यामध्ये दोन-तीन लोक होते हे मी सांगायची गरज नाही. इथलं राजकारण सुधारण्यासाठी काम करणार आहे’. आज पक्ष म्हणून काही संकट आहेत. ज्यानी पक्ष फोडला, ज्यांनी समाजा समाजामध्ये अंतर वाढवायची भूमिका घेतली. बीड जिल्ह्याचा ऐक्याचा आणि गुन्हा गोविंदाचा आदर्श उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तींना उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने पराभूत करा. राजसाहेब देशमुख यांना निवडून आणा, असं आवाहन देखील शरद पवार यांनी केलं.