ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवारांची न्यायालायात धाव : ‘घड्याळ’ चिन्ह गोठविण्याची केली मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध आता सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. या तुतारी चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी शरद पवार गट करत आहे. मात्र, तत्पूर्वी अजित पवार यांना मिळालेल्या घड्याळ या चिन्हाबाबत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या चिन्ह बाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, अथवा घड्याळ हे चिन्ह विधानसभा निवडणुकीपुरते गोठवून ठेवा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या निवडणूक चिन्हा बाबतचा वाद सर्वोच्च न्यायालय सुरू आहे. यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्या, नसता विधानसभा निवडणुकीपूर्वी घड्याळ हे चिन्ह गोठवा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. या संदर्भात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवली असली तरी अनेक मतदारसंघांमध्ये तुतारी चिन्हा सारखे इतर चिन्ह असल्यामुळे शरद पवार गटाला त्याचा फटका बसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या वतीने आता ही इतर चिन्हे गोठवण्यात आली आहेत. त्याचा फायदा आता आगामी निवडणुकीत शरद पवार गटाला होऊ शकतो. मात्र दुसरीकडे अजित पवार यांना मिळालेल्या घड्याळ या चिन्हाचा फायदा त्यांना होताना दिसत आहे. त्यासाठीच आता शरद पवार गटाने घड्याळ या चिन्हाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!