---Advertisement---

धनगर समाजाचा एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी रास्ता रोको

By team
On: September 21, 2024 9:13 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

राज्यातील धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी येत्या सोमवारी दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अक्कलकोट येथे अक्कलकोट ते सोलापूर या राज्यमहामार्गावर एमएसईबी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आले.

यावेळी सुनिल बंडगर, दत्तात्रय माडकर, सुभाष पुजारी, स्वामीराव घोडके, अप्पू चेंडके, सुर्यकांत बाचके, भुताळी वागदरी, विष्णू ठेंगले, हणमंत बिराजदार, कृष्णप्पा बिराजदार, संतोष फुलारे आदी उपस्थित होते. ९ सप्टेंबर पासून पंढरपूर येथे पाच धनगर समाज बांधव आमरण उपोषणास बसले आहेत.पण सरकार यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसून येत नाही. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करु नये, यासाठी २५ आमदार ४ खासदार मिळून सरकारकडे मागणी केली आहे.

अदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचे धक्का न लावता धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही सकल धनगर समाजाची मागणी आहे.तरी सकल धनगर समाजाच्यावतीने २३ सप्टेंबर रोजी संपुर्ण महाराष्ट्रात एकदिवसीय रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने अक्कलकोट शहर व तालुका सकल धनगर समाज बांधवांच्यावतीनेही आंदोलन करण्यात येणार आहे. तरी अक्कलकोट तालुका व शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन सकल धनगर समाज बांधव अक्कलकोट तालुक्याच्यावतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!