मुंबई: भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवातच पडझडीने झाली. शेअर मार्केटमध्ये पडझड झाल्याने व्यापार्यांमध्ये मोठ्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेअर बाजाराचे व्यवहार सकाळी सुरु झाल्यानंतर लागलीच एक हजारांहून अधिक अंकाची सेन्सेक्स कोसळले. जागतिक बारपेठेमधील निगेटीव्हीटी अर्थात घसरण यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
सकाळी 9 वाजून 18 मिनिटांनी शेअर बाजार सुरु झाला तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील सेन्सेक्स 50 हजार 184.60 वर होता. काल बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 51 हजारांवर होता. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी हा निर्देशांकही 283.45 अंकांनी घसरला आणि 14.835.45 वर स्थिरावला. कालच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये 1.68 टक्के तर निफ्टीमध्ये 1.87 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स एक हजार अंकांनी घसरला होता.