सोलापूर – येथील शिवसेना शहरप्रमुख प्रमुख तथा प्रभाग क्रमांक १९ चे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर यांच्या निधीतून आज नीलम नगर शिवगणेश मंदिर जवळ श्रीराम बोध्दुल घर ते दिकोंडा घर ते अनिल बोडा घर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले.
ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम समाजातील शिवसैनिक इम्रानभाई पठाण, मेहबूब शेख तसेच महानगरपालिकेतील उत्कृष्ट कामगिरी बजावणारे आरोग्य निरीक्षक रिजवान पटेल यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाला आरंभ करण्यात आला.
तत्पूर्वी नागमणी यनगंदुल, बालमणी कोंगारी, सुजाता महिंद्रकर, अरुणा दिकोंडा, माया दासरी, मेघा कोंगारी, सौ.पाटील, सुवर्णा बोध्दुल, आरकाल आदी स्थानिक माता-भगीनींच्या हस्ते पूजा करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनील बळी, शिवसेना उपशहरप्रमुख कोळप्पा विटकर, सचिन गंधुरे, सिध्दाराम खजुरगी, युवासेना उपशहरप्रमुख राहुल गंधुरे, संभाजी आरमारचे सागर ढगे, जयराम सुंचू, नरेंद्र क्षीरसागर, देवा विटकर, विष्णू शिंदे, देविदास कोळी, उमेश जेटगी, लक्ष्मीकांत कल्लुरे, दया अंटद आदी मान्यवर उपस्थित होते.
गोविंद श्रीराम, शिवकुमार नक्का, अनिल बोडा, अंबादास गड्डम, चक्रपाणी मासन, रामकृष्ण चव्हाण, प्रथमेश चव्हाण, राहुल कोंगारी, सत्यनारायन यनगंदुल, अरविंद यनगंदुल, राजेंद्र सामल, जगदीश कारमपुरी, लक्ष्मण वाले, सदानंद श्रीराम व सुधाकर महामुरे आदी स्थानिक नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित राहून गुरुशांत धुत्तरगांवकर यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन केवळ विकास काम दृष्टीपथात ठेवून काम करणारे नेतृत्व लाभल्यामुळे प्रभागात अभूतपूर्व कामे होत आहेत. पुरेसा निधी न मिळणं, कोवीड सारखी महामारी अशी संकटे आली तरी रात्री-अपरात्री सुद्धा केवळ एका फोन कॉल वर सहज उपलब्ध होणारे लोकप्रतिनिधी लाभल्याचा आनंद वाटतो अशी भावना यावेळी येथील नागरिकांनी व्यक्ती केली.