ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धक्कादायक : नशेखोरांनी केली महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना २० रोजी भाईंदरच्या धारावी परिसरात अमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस पथकावर अचानक नशेखोरांनी हल्ला चढवला. यावेळी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाकडी बांबूने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत महिला पोलीस जखमी झाली आहे. या प्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळला आहेत. अब्बास अली मिर्झा (वय ३८) अंकुर भारती (वय २८) आणि राजू गौतम (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरात ड्रग्ज तस्करीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातर्फे सध्या अमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यात येत आहे. दररोज नशेबाजांची धरपकड करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

अशातच बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अमली पदार्थ विरोधी शाखेच्या ५ जणांचे पथक भाईंदर पश्चिम येथील उत्तन परिसरातील धावगी डोंगर येथे गेले होते. त्यावेळी १५ ते २० जणांनी पोलिसांशी वाद घालून मारहाण केली. यामुळे पोलिसांना जीव वाचवून माघारी फिरावं लागलं. यावेळी काही नशेबाजांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत लता एकलदेवी या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!