---Advertisement---

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वागदरीची श्री परमेश्वर रथोत्सव यात्रा रद्द

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट,दि.७ : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर रथोत्सव यात्रा रद्द करण्यात आली आहे.

ग्रामदैवत श्री परमेश्वर देवस्थान महाराष्ट्र मराठवाडा व कर्नाटक सिमेलगत भागात प्रसिद्ध देवस्थान म्हणून परिचित आहे.गेल्या अनेक वर्षाची ऐतिहासिक असलेले श्री परमेश्वर रथोत्सव दरवर्षी अतिशय मोठ्या व उत्साहाने साजरा केला जातो .पण गेल्या वर्षी सारखे यंदा हि कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१चे कलम ४३ अन्वये पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या सूचनेनुसार जनतेच्या हिताचा व आरोग्याचा विचार करून लोकांचा समूह व जमाव एकत्र येऊ नये म्हणून दि.१३ ते दि.१८ पर्यंत होणारे परमेश्वर यात्रेतील सर्व कार्यक्रम,रथोत्सव,कुस्ती,नाटक व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय यात्रा पंचकमिटीने संयुक्त बैठक घेऊन ठरवले आहे.

तरी सदभक्तांनी सार्वजनिक हिताचा व आरोग्याचा विचार करून जमाव अथवा गर्दी न करता यात्रा पंचकमिटीस सहकार्य करावे,असे आवाहन श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट व श्री परमेश्वर यात्रा पंचकमिटीने कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!