ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अयोध्येतील बेटावर होणार श्रीराम जीवनदर्शन देखावे

अयोध्या : वृत्तसंस्था

अयोध्येतील शरयू नदीतील बेटावर प्रभू श्रीरामांच्या बालकाळापासूनचे विविध देखावे सजवले जात आहेत, तसेच येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

येत्या २२ जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा रंगणार आहे. त्यानिमित्त विविध कामांना वेग आला आहे. शरयू नदीतील बेटावर श्री रामचरित अनुभव केंद्र, सप्तऋषी आश्रम ज्ञान गुहा, श्री राम जप पाठ पर्यटकांना त्रेता युगाचा अनुभव देतील. बोटीद्वारे या ठिकाणी देशी व विदेशी पर्यटकांना जाता येईल व तेथे दोन-चार दिवस राहून साधना, ध्यान, रामभजन करता येईल. ७५ एकरच्या या बेटावर विकसित होत असलेल्या पंचवटी दीपसाठी फायबरच्या मूर्ती कोलकाता येथे तयार केल्या जात आहेत. दीपनिर्मितीचे काम वेगाने करण्यात येत आहे. सप्तऋषींचे वेगवेगळे आश्रम या ठिकाणी उभारले जात आहेत. ते पर्यटकांचे खास आकर्षण असतील. गवत व इतर साहित्याच्या मदतीने तयार केल्या जात असलेल्या गुहांमध्ये साधू संत, पर्यटक ध्यानधारणा करू शकतील. तसेच या ठिकाणी झाडे, वृक्ष लावून नक्षत्र वाटिकाही तयार केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!