---Advertisement---

तरुणाला नोकरी शोधणे पडले २.८० लाखात !

By team
On: November 24, 2023 10:22 AM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक तरुण बेरोजगार असल्याने तरुण नेहमीच नोकरीच्या शोधात असतात, त्यामुळे तरुण सोशल मिडीयावर अनेक मार्गाने नोकरीचा शोध घेत असतांना एक तरुणाला मोठा फटका देखील बसला आहे. तरुणाने एका अॅपवर आपला रिझ्युम अपलोड करणे महागात पडले. सायबर गुन्हेगारांनी त्याला टेलिग्राम टास्कच्या जाळ्यात ओढत २.८० लाखांचा गंडा घातला. सूरजराज रमेशराव शेंडे (३४) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. हि घटना नागपुरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने ‘अपना नाम’ अॅपवर रिझ्युम अपलोड केला. ३ नोव्हेंबरला त्याला एकाचा फोन आला व साइडएअर वर्ल्ड या कंपनीतून बोलत असल्याचे सांगत ‘साइड नेटवर्क’ या कंपनीत विमानाची तिकिटे बुक करण्याचे ऑनलाइन काम असल्याची बतावणी केली. या कामात पैसे लावल्यास जास्त नफा मिळेल, असे आमिष दाखविले व सुरुवातीच्या कामावर टेलिग्राम अॅपच्या खात्यावर रक्कम पाठवली. त्यामुळे सूरजराजचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी गुंतवणुकीवर नफ्याचे आमिष दाखवत वेगवेगळ्या खात्यांवर २.८० लाख रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र, नफा दिला नाही. सूरजराजने रक्कम परत मागितली असता आणखी पैसे भरावे लागतील, असे सांगण्यात आले. फसवणूक लक्षात येताच त्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!