ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तडवळ भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सिद्धाराम म्हेत्रेंना निवडुन द्या

ही माझी शेवटची निवडणूक, माजीआमदार सिद्रामप्पा पाटलांना अश्रु अनावर

अक्कलकोट वृत्तसंस्था 

 

गेल्या वेळेस साधा जिल्हा परिषद, पंचायत समिती मेंबर नसलेल्या सचिन कल्याणशेट्टी यांना आम्ही आमदार म्हणून निवडुन आणले. युवक आहे काहीतरी करील म्हणुन या तडवळ भागातुन नऊ हजार मतांची आघाडी दिली होती. पण अपेक्षा भंग झाला.माझी ही शेवटची निवडणुक आहे. यावेळेस एकदा सिद्धाराम म्हेत्रे यांना निवडून द्या,असे भावनिक आवाहन माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी केले.

रविवारी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारार्थ जयशंकर प्रशाला तडवळ मैदान येथे मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला संबोधित करताना पाटील बोलत होते.

यावेळी उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे, संजीवकुमार पाटील, शिवानंद पाटील, आनंद बुक्कानुरे, शिवसिद्ध बुळ्ळा, शरणप्पा माशाळे, बाबुशा कोडते, शिवमुर्ती विजापुरे, शिवयोगी स्वामी, महांतेश हत्तुरे, शिवयोगी लालसंगी, महादेव पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश हिप्परगी, मल्लिकार्जुन नागशेट्टी आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना पाटील म्हणाले, आमदार झाल्यावर तालुक्यातल्या सर्वच  रस्त्याच्या कामांसाठी कोट्यावधी रूपये निधी खर्च करूनही रस्त्याची कामे निकृष्ट झाली आहेत. दुप्पट तिप्पट रक्कम दिलेले  नुसते कागदावर आहे. तडवळ, मुंढेवाडी, कोर्सेगांव या भागातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खराब झाले आहेत. तडवळ भागातील नेत्यांसाठी आम्ही कोर्ट कचे-या केले, आर्थिक मदत केली. त्यांना उभे केले. आता त्यांना पैशाचे आमिष देऊन आमच्या कार्यकर्तांना फोडण्याचे काम विरोधक करत आहेत.

वयाच्या ८६ व्या वर्षी आमदार कल्याणशेट्टी यांनी दिलेला त्रास सांगताना ते भावनिक  झाले व त्यांना अश्रु अनावर झाले. त्यांना रडताना पाहुन सर्व उपस्थित जनता भावुक झाली. तडवळ भागातील सर्वागीण विकासासाठी व देगांव एक्सप्रेस कॅनॉलचे उर्वरित काम पुर्ण करून सुजलाम सुफलाम करण्यासाठी व सिद्रामप्पा पाटलांचे स्वप्न  पुर्ण करण्यासाठी परत एकदा संधी द्या, असे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.

यावेळी आनंद बुक्कानुरे, महांतेश हत्तुरे, व्यंकट मोरे, दत्ता थोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, तडवळ पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!