---Advertisement---

दिवाळीच्या पूर्वीच सोन्यापाठोपाठ चांदीचे दर विक्रमी पातळीवर !

By team
On: October 14, 2025 9:29 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

येत्या काही दिवसात दिवाळीला सुरुवात होणार असताना सोन्यापाठोपाठ चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेले असून, जीएसटीसह चांदीचा दर प्रतिकिलो 1 लाख 85 हजार रुपयांवर गेला आहे. सोन्याचा दर जीएसटीसह प्रति दहा ग्रॅम एक लाख 28 हजार रुपये झाला आहे.

चांदीच्या दरात गेल्या आठ दिवसांमध्ये 25 हजार रुपयांची मोठी दरवाढ झालेली दिसते. देशपातळीवर एमसीएक्स या वायदेबाजारातही 9 ऑक्टोबरला चांदीचा प्रतिकिलो दर 1 लाख 58 हजार रुपये होता. त्यात सोमवारी (13 ऑक्टोबर) 1 लाख 71 हजार 85 रुपयांपर्यंत वाढ झाली. सणासुदीमुळे वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत कमी पुरवठा यामुळे प्रामुख्याने चांदी भाव खाऊ लागली आहे.

इलेक्ट्रिक वाहन, सौरऊर्जा, सेमीकंडक्टरसाठी चांदीची वाढलेली मागणी आणि या मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात झालेली घट यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चांदीची लक्ष्मी प्रतिमा, नाणी, समई यांना मागणी वाढते. त्याचा परिणाम स्थानिक बाजारात दिसून येत आहे. एमसीएक्स या वायदेबाजारातही 9 ऑक्टोबरला चांदीचा प्रतिकिलो दर 1 लाख 58 हजार रुपये होता. 24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव 1 लाख 24 हजार रुपये असून जीएसटीसह 1 लाख 27 हजार 720 रुपये तोळ्याला मोजावे लागत आहेत. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 15 हजार 400 रुपये असून, जीएसटीसह 1 लाख 18 हजार 862 रुपये मोजावे लागत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!