---Advertisement---

महामार्ग ओलांडणाऱ्या सहा जणांना अज्ञात वाहनाने चिरडले

Follow Us:
---Advertisement---

पुणे : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ येथे महामार्ग ओलांडणाऱ्या सहा जणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर दौंड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काल सायंकाळच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या लेनवर कुरकुंभ येथील एसबीआय बँकेजवळील चौकानजिक महामार्ग ओलांडणाऱ्या सहा जणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातातील मृत व्यक्ती परप्रांतीय कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेच्या दिवशी मजुरीचे काम उरकून ते कुरकुंभला येत होते.

यादरम्यान पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एमआयडीसी चौकात ते आले असता त्यांना भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. मात्र मृतांची नावे अद्याप समजू शकली नाही. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर रुग्णवाहिकेच्या साह्याने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!