छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांचा लढा सुरु असून त्यांनी आज पुन्हा एकदा सरकारसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जरांगे पाटील म्हणाले कि, आता आरक्षण मिळवणे किंवा पाडापाडी करणे हेच उद्दिष्ट आहे. मराठा आरक्षणावरुन विरोधक आणि सत्ताधारी हे उल्लू बनवत आहेत. आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही सत्ता येऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच मराठ्यांना आरक्षण मिळू नये हा राजकीय लोकांचा डाव आहे. त्यांना मराठे मोठे व्हावेत असं वाटत नाही, असे ते म्हणालेत.
यावेळी बोलतांना जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप केले आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा केल्याचे बोलले जात आहे. यावर ते म्हणाले, ही केवळ घुमावघुमवी आहे. मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे हे काम आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी मिळून आरक्षण द्यायला हवे. आरक्षण द्यायला काहीच लागत नाही. मनात असेल तर काही करता येते”, असे जरांगे म्हणाले.
तसेच पुढे ते म्हणाले की, ”राजकीय नेत्यांना आणि समाजाला आमच्यात आणि सरकारमधील चर्चेची माहिती हवी असेल तर सर्व लाईव्ह आहे. सत्ताधारी आणि विरोधक गैरसमज पसरवणार आहेत. माझ्या समजाने का नेत्यांच्या हमाल्या करायच्या का? विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचे हे समाजासाठी नाटक आहे. 70 वर्षांपासून आम्हाला वेड्यात काढत आहेत. लोकांच्या मनात अती खदखद आहे. लोकांना समजते की आपल्याला कोण उल्लू बनवत आहे. विरोधक आणि सत्ताधारी हे मराठ्यांना उल्लू बनवत आहेत”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
तसेच पुढे जरांगे यांनी राजकीय नेत्यांवर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, मराठ्यांना आरक्षण मिळू नये हा राजकीय लोकांचा डाव आहे. त्यांना मराठे मोठे व्हावेत असं वाटत नाही. समाजाला काही माहिती हवी असेल किंवा राजकीय नेत्यांना काही माहिती हवी असेल तर सर्व लाईव्ह आहे. समाजाला न्याय मिळून द्यायचा असेल तर त्यांनी एकत्रित यावे. आमचा जीव आरक्षणात आहे मात्र सरकारचा जीव खुर्चीत आहे”, असे ते म्हणाले.