---Advertisement---

‘लाडकी बहिण’ योजना : अजित पवार विरोधकांवर बरसले

By team
On: July 27, 2024 3:27 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसाआधी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना सुरु केली होती मात्र नंतर वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यान घेरले होते. आज त्यावर अजित पवारांनी ट्विट करीत यावर पडदा पाडला आहे. राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर होत असलेल्या टीकेवर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच निधी नसल्याच्या बातम्यांत तथ्य नाही असेही ते म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

खरे तर, या योजनेची घोषणा झाल्यापासून सातत्याने विरोधकांकडून यावर टीका केली जात आहे. सरकारवर आधीच कर्ज असताना या योजनेसाठी पैसा कुठून आणणार असा सवाल उपस्थित केला जात होता. तसेच नुकतेच योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याची माहितीही समोर आली होती. मात्र या सर्व बातम्या कपोलकल्पित असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार यांचे ट्विट काय?
”महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली. चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार?, हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे.

राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही. काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या, या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया…. असे अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!