अमरावती : वृत्तसंस्था
महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलीय. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठे वाद विवाद सुरू आहेत. त्यातच आता आमदार रवी राणा यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला आर्शीवाद दिले नाही तर तुमचे दीड हजार काढून घेऊ असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले रवी राणा?
विधानसभेसाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. आमचे सरकार आले तर तुम्हाला देण्यात येणारे पैसे दीड हजारवरून तीन हजार करू. पण, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही त्यांच्या खात्यातून दीड हजार रुपये काढून घेऊ. तुमचा भाऊ म्हणून मी हे सांगत आहे, असं राणा म्हणाले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा अमरावती येथे रणी राणा यांनी घेतला होता. यावेळी ते बोलत होते.