मुंबई : वृत्तसंस्था
देशाचे गृहमंत्री अमित शहा नुकतेच राज्याच्या दौऱ्यावर येवून गेले त्यांनी थेट शरद पवारांना हिशोब मागितला त्यावर आता शरद पवार गटाच्या खा.सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांच्या आरोपावर हल्लाबोल केला आहे.
हिशोब हा व्यवहार नाहीय, ती समाजसेवा आहे. आम्ही राजकारणात हिशोब करण्यासाठी नाही आलो, आम्ही मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो आहोत. महाराष्ट्राच्या जनतेनं ५५ वर्ष शरद पवार यांना आशीर्वाद दिलाय. ५५ वर्ष जनता खंबीरपणे पवार साहेबांच्या पाठीशी उभी राहिली आहे. ते जनतेतून निवडून गेले आहेत. हेच जनतेचं प्रेम आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, भारतातल्या सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देते. जगात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. याचा आनंद असतोच. पण मला नेहमी असं वाटतं की, जागतिक महिला दिन साजरा झाला पाहिजे. पण ३६५ दिवस माणुसकीचा दिवस साजरा केला, तर महिला आणि पुरुष यांच्या समतेबद्दल आपण सर्वच लढत असतो. त्याला आणखी एक खूप मोठी दिशा आणि ताकद पाहिजे. मी अमित शहा यांचे मनापासून आभार मानते, कारण त्यांनी जो आरोप केला तो परिवारवादावर होता. त्यांनी भ्रष्टाचाराचा एकही आरोप आमच्यावर केला नाही.
अमित शहा जेव्हा महाराष्ट्रात यायचे, तेव्हा ते नॅचरली करप्ट पार्टी (एनसीपी) असं ते म्हणायचे. पण आता त्यांनी भ्रष्टाचाराचा एक शब्दही काढला नाही. मी परिवारवाद आहे ना. वकीलाचा मुलगा वकील होऊ शकतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, मग आम्ही लोकांमध्ये जाऊन मतं मागू शकत नाही का, भारतीय जनता पक्षातही अनेक परिवारवाद आहेत. जेव्हा एक बोट तुम्ही आमच्याकडे दाखवलं तर तीन बोटे तुमच्याकडे येतात, असं अमित शहा म्हणाले होते. आता त्यांना मी याची आठवण करुन देते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.