---Advertisement---

फडणवीसांनी उडविली ठाकरेंची खिल्ली : गल्लीतील नेत्याने…

By team
On: March 8, 2024 6:01 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

नितीन गडकरी यांनी भाजपमधून बाहेर पडावं. आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीमधून निवडून आणू. दिल्लीला महाराष्ट्राची धमक दाखवा. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही. नितीन गडकरी यांना मी जाहीर सांगतो, राजीनामा द्या. आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणू,असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी लागलीच उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या या विधानाची खिल्ली उडविली आहे.

फडणवीस यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे. त्यांनी नितीन गडकरी यांना ऑफर देणे म्हणजे गल्लीतील नेत्याने अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षपदाची ऑफर देण्याचा प्रकार आहे. नितीन गडकरी आमचे मोठे नेते आहेत. जेव्हा महाराष्ट्राची यादी येईल तेव्हा नितीन गडकरी यांच नाव त्यात नक्की असेल. पहिल्या यादीत महाराष्ट्रातून कुणाचंही नाव नव्हतं. जेव्हा महाराष्ट्राची लिस्ट येईल, तेव्हा सर्वात आधी नितीन गडकरी यांचे नाव असेल. उद्धव ठाकरे असं बोलून स्वतःचं हासे करून घेत आहे, अशी टोला देवेंद्र फडणवीस यांनी लागवला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!