ध्यास विश्वसार्ह बातमीचा

म्हणून आम्ही मनसेचे महायुतीत स्वागत करू ; अजित पवार

मुंबई : वृत्तसंस्था

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली येथून जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधकांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले होते तर सत्ताधारी नेत्यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर भाष्य केले आहे.

राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर निश्चित फायदा होईल असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच आम्ही मनसेचे स्वागतच करू असेही ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बैठक सुरू आहे. या बैठकीत मनसेचा महायुतीत समावेश करण्याच्या मुद्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले, ”राज ठाकरे महायुतीत येणार अशी चर्चा सुरू आहे. अंतिम चर्चा काय झाली हे माहिती नाही. आणखी एक बैठक होणार आहे असे माध्यमांमधून कळाले आहे. शेवटी कोणत्याही युतीत जर कोणी आले तर बेरीजच होत असते. त्याचा फायदाच होत असतो. त्यामुळे राज ठाकरे येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे”, असे म्हणत अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. पुढे अजित पवार यांनी माजी आमदार विजय शिवतारे यांच्याबाबत देखील भाष्य केले आहे. ”लोकशाहीत निवडणूक लढवायचा प्रत्येकाला अधिकार आहे. लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असता तेव्हा प्रत्येकाने तुमचा उदोउदो केला पाहिजे असे काही कारण नाही. त्यामुळे शिवतारेंच्या मनात आले ते बोलले”, असे अजित पवार यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!