---Advertisement---

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सात गावातील कोतवाल पदाचे आरक्षण निश्चित

Follow Us:
---Advertisement---

 

दक्षिण सोलापूर, दि.२० : ( नागनाथ विधाते ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील सात गावातील कोतवाल पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.चिट्ठीद्वारे हे आरक्षण काढण्यात आले.गुरुवारी,दुपारी १२ वाजता दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात
सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार राजशेखर लिंबारे, निवासी नायब तहसीलदार आर.बी भंडारे, महसूल नायब तहसीलदार डी.एफ. गायकवाड, निवडणूक नायब तहसीलदार व्हि.बी. जाधव, नायब तहसीलदार आरती दाबाडे, परिविक्षाधीन नायब तहसीलदार किरण फुले, अव्वल कारकून पुरुषोत्तम शिंदे यांच्या सह कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कोतवाल भरती प्रक्रियेत वळसंग (अनुसूचित जाती महिला), वडकबाळ (अनुसूचित जमाती),मुस्ती ( भटक्या जमाती ब), हत्तुर (भटक्या जमाती ड), बोरामणी (इतर मागास प्रवर्ग), तोगराळी (आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक) सिंदखेड (अनुसूचित जमाती महिला) असे आरक्षण निश्चित झाले असून लवकरच या पदांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!