---Advertisement---

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा अन्यथा पालकमंत्र्यांना फिरकू देणार नाही; शिवसेना प्रवक्ते प्रा.लक्ष्मण हाके यांचा इशारा

Follow Us:
---Advertisement---

पिलीव : ता (माळशिरस)
सोलापूर जिल्हा दुष्काळ ग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करा अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्हयात पाय ठेवू देणार नाही तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना शिवसैनिक शेतकऱ्यांसह घेराव घालतील असा इशारा शिवसेना प्रवक्ते प्रा लक्ष्मण हाके यांनी आज दिला आहे.

युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीने माळशिरस तालुक्यातील पिलीव , सुळेवाडी , कारखेल , जळभावी, गोरडवाडी, गारवाड इत्यादी भागातील टंचाईग्रस्त वाड्या वस्त्यावरती जाऊन शेतकऱ्यांना मेंढपाळांना भेट देण्यात आल्या त्यावेळी शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके बोलत होते.

अधिक बोलताना हाके म्हणाले की आज आम्ही बांधवांवर जावून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहोत .शेतीसाठी पाण्याची तिव्र टंचाई आहे ,मेंढपाळ तसेच पशुपालक शेतकऱ्यांपुढे चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे.निम्मा पावसाळा संपल्याने खरिपाचा हंगाम पुर्ण वाया गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थिक चक्र कोलमडले आहे.

या प्रश्नांवर शासनाने यात त्वरित लक्ष घालावे चारा डेपो सुरू करावेत, पिण्याच्या पाण्यासाठी त्वरित टँकर सुरू करावेत, वन विभागाकडून मेंढपाळांना चराईसाठी परवानगी मिळावी, पावसाअभावी करपून गेलेली खरीपातील सर्व पिके धनधान्य यांना सरसकट विमा मिळावा अशा मागण्या देखील हाके यांनी यावेळी केल्या आहेत.

आठवड्यात जर चारा डेपो चालू झाले नाहीत आणि सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने , युवा सेनेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात उग्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा देखील प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी दिला.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार जनतेच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत हे सर्व आमदार खासदार टेंडर कमिशन यामध्ये गुंतल्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही असा गंभीर आरोप देखील हाके यांनी यावेळी केला आहे.

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे,शिव सेना तालुकाप्रमुख संतोष राऊत, युवा सेना तालुकाप्रमुख सुभाष काकडे ,युवासेना उपतालुकाप्रमुख डॉक्टर निलेश कांबळे, दत्तात्रय साळुंखे, दुर्वा आडके, संदीप भैया कदम,शिवसेना शहर प्रमुख योगेश देशमुख, युवा सेना शहर प्रमुख देवा लोखंडे, उमाजी बोडरे, ऍड ओम कालेकर, ज्ञानदेव लेंगरे, निशांत दोलताडे, रामचंद्र सुळे, प्रवीण माने ,बंडू नरळे, जीवन लोखंडे , सुनील मिसाळ, अजय नाईक नवरे , अर्जुन लोखंडे इत्यादी युवा सैनिक शिवसैनिक या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित
होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!