ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त महामार्ग – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सोलापूर वृत्तसंस्था 

सोलापूर दक्षिण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ निमित्त सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  बोलत होते. ते म्हणाले, मागच्या 10 वर्षांत 937 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्यात झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त महामार्ग ज्या जिल्ह्यात झाले तो जिल्हा म्हणजे सोलापूर. त्या वेळी जवळपास ३५ कामे होती, त्यातील १९ कामे पूर्ण झाली असून १६ कामे प्रगतीपथावर आहेत. सोलापूरमध्ये  आतापर्यंत १८ हजार कोटींची कामे झाली असून पुढच्या काळात आणखी पाच हजार कोटींची कामे होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, माझी आई तिच्या मृत्यूच्या सहा महिने अगोदर सोलापुरात आली होती. तेव्हा ती तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि गाणगापूरला गेली होती. त्यावेळी तिने मला सांगितले होते की ‘नितीन, आपल्या धर्माचे लोक एवढ्या श्रद्धेने या तीर्थक्षेत्राला येतात. पण, तेथील रस्ते चांगले नाहीत. अक्कलकोट ते गाणगापूर हा रस्ता तर प्रचंड खराब असून माझी कंबर लचकून गेली आहे. तुला परमेश्वराने कधी संधी दिली, तर या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाणारे रस्ते जरूर चांगले कर, अशी इच्छा व्यक्त केली होती. नशिबाने मला रस्ते बांधणी मंत्रालय मिळाले आणि महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रांना जोडणारे रस्ते करत आईची इच्छा पूर्ण केली, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

माझी आई मृत्यूपूर्वी सहा महिने आधी सोलापुरात आली होती. तेव्हा ती तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर आणि गाणगापूरला जाऊन आली होती. तिने त्यावेळी मला सांगितलं की नितीन, आपल्या धर्माचे लोक एवढ्या श्रद्धेने त्या ठिकाणी येतात. पण तेथील रस्ते चांगले नाहीत. अक्कलकोट ते गाणगापूर हा रस्ता तर प्रचंड खराब आहे. तुला परमेश्वराने संधी दिली तर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाणारे रस्ते जरूर चांगले कर, अशी इच्छा आईने व्यक्त केली होती, असे गडकरींनी नमूद केले.

ज्या वेळी मी मंत्री झालो, त्या वेळी एक गोष्ट लक्षात आली की आपल्या देशाची संस्कृती, इतिहास आणि विरासत ही आपल्या तीर्थक्षेत्राशी संबंधित आहे. समाजाला दिशा देणाऱ्या संतांचे ज्ञानपीठ त्या ठिकाणी आहे. मी मंत्री झालो आणि रस्ते बांधणी मंत्रालयात काम करण्याची संधी मिळाल्याने महाराष्ट्रातील सर्व तीर्थस्थळांना मजबूत रस्त्याने जोडण्याचे भाग्य मला मिळाले, माझ्या आयुष्यातील तो भाग्याचा क्षण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गडकरी म्हणाले, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे काम आता जवळपास पूर्ण होत आले आहे. श्रीनगर ते काश्मीरपर्यंत 19 टनेल बनून पूर्ण झाले आहेत. काश्मीर ते कन्याकुमारीला रस्त्याने जोडण्याचे कामही मला करता आले, याचा आनंद आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!