सोलापूर : सोलापूर – अक्कलकोट रोडवर कुंभारी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचा मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितिनुसार या अपघातात अंदाजे तीन ते चारजण जागीच ठार झाले आहेत. अक्कलकोटहून एक प्रवासी जीप (क्रूझर जीप, एमएच 13 एएक्स 1237) सोलापूरच्या दिशेनं निघाली होती. भरधाव असलेल्या जीपचा अचानक पुढील टायर फुटला. त्यामुळे जीप उलटली. इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, जीपचा चेंदामेंदा झाला. तर पाच प्रवाशी जागीच ठार झाले.
कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर, अक्कलकोट व गाणगापूर असा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश आहे. अक्कलकोटहुन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन सोलापूरकडे जात असताना हा अपघात झाला. एकूण आठ प्रवाशांपैकी चार जण गंभीर जखमी व चारजणांचा मृत्यू झाल्याची शक्यगता व्यक्त करण्यात येत आहे. काही प्रवाशांचे मृतदेह रस्त्याच्या आजूबाजूला फेकले गेले. तर जवळपास 6 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. नागरिकांनी दुर्घटनेतील जखमींना ग्रामस्थांना तातडीने बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने सोलापूर जिल्हा रुग्णालय, तसेच जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वळसंग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांकडून तपास केला जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने नागरिक खासगी प्रवासी वाहनांनी प्रवास करताना दिसत आहे. अनेक ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहनात बसवले जात असल्याचाही प्रकारही सुरू आहे. मात्र, हा अपघात क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी बसवल्याने झाला की अन्य इतर कारणांनी हे अद्याप स्पष्ट झाली नाही.