वाढत्या महागाईत दिलासादायक बातमी, महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरचे दर ‘’इतक्या’’ रुपयांनी झाले कमी
दिल्ली : वाढत्या महागाईत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशभरातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य नागरिक होरपळून निघाले आहेत. मात्र आज नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरचे दर कमी झाले आहेत. वाढती महागाई लक्षात घेता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आज १ नोव्हेंबर २०२२ पासून १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ११५.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी झाले असले, मात्र घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही