ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्‍फाेटके बनविण्याच्या कंपनीत स्‍फाेट : दोन कामगारांच्या मृत्यूने नागपूर हादरले !

नागपूर : वृत्तसंस्था

राज्यातील नागपूर जिल्ह्यातून गेल्या काही दिवसापासून अनेक खळबळजनक घटना समोर येत असतांना नुकतेच आता जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज (रविवार) मोठा स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार दोन कामगारांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाल्याची माहिती असून जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह पोलिस, अग्निशमन, रुग्णवाहिका, फॉरेन्सिकचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.

या स्‍फोटाची तीव्रता इतकी होती की या स्फोटाचे हादरे परिसरात अनेक किलोमीटर अंतरावर बसल्‍याची माहिती स्‍थानिक नागरिकांनी दिली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील जंगलातसुद्धा मोठ्या प्रमाणात आग लागली असून अनेक कामगार मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती पसरताच आजुबाजूच्या गावातून लोकांनी गर्दी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सलील देशमुख देखील काही वेळातच घटनास्थळासाठी पोहोचले. फटाक्यात लागणारी बारूद या ठिकाणी तयार होत असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!