सोलापूर – भारतीय जनसंघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त व भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त श्री शिवयोग धाम सेवा समिती, शेळगी, सोलापूर व श्री गुरु सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र, गौडगाव (बु) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत लसीकरण व सर्वरोग निदान आरोग्य शिबिर उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेत आरोग्य तपासणी केली.
श्री शिवयोग धाम सेवा समिती, शेळगी, सोलापूर येथे रविवारी हे शिबीर पार पडले. समाजातील गरीब आणि गरजू लोकांपर्यंत प्रभावी आरोग्यसुविधा औषध उपचार मिळावेत. शहर व ग्रामीण भागातील अनेक लोकांना आर्थिक परिस्थितीमुळे औषध उपचार व आरोग्य तपासणी करता येत नाहीत, अशा गरजू लोकांना पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७१व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कोव्हीशील्ड या लसीचे लसीकरण करून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराचे उदघाटन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, महिला बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, नगरसेवक अविनाश पाटील, भाजप शहर संघटन मंत्री रुद्रेश बोरामणी, सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांच्या उपस्थितीत पार पडले.
या शिबिरामध्ये मोफत मधुमेह रक्त चाचणी, रक्तदाब, दंतआरोग्य तपासणी व प्राथमिक उपचार, नेत्ररोग, यासारख्या तपासणी मोफत घेण्यात आल्या. डॉ.गजानन भोसले (दंतरोग तज्ञ्), डॉ.बिरंगणे डॉ. संजय मंठाळे, डॉ. शैलेश पाटील, डॉ.राहुल मेडीदार, सन्मित शहा (नेत्र तंत्रज्ञ), डॉ. प्रसाद कोलूरकर, डॉ. प्रियांका कादे सहभागी होते. शिबिराचा अधिकाधिक गरजु रुग्णांनी लाभ घेतला. श्री शिवयोगी धाम सेवा समिती व श्री गुरु सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्राचे पदाधिकारी, कर्मचारी, सेवक वृंदांनी हे शिबीर पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.