---Advertisement---

मध्यरात्री विसर्जनाची मिरवणूकीवर दगडफेक : पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

By team
On: September 18, 2024 9:46 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात बाप्पांना मनोभावे निरोप देत असतांना भिवंडीच्या वंजार पट्टी नाका परिसरात विसर्जनासाठी जाणाऱ्या गणपती मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जनाची मिरवणूक जागीच थांबविली आहे. दरम्यान कामवारी नदीकडे मिरवणूक जात असताना रात्री 1 वाजता मुर्तीवर अचानक दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे परिस्थिती चिघळली असून परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. खबरदारी म्हणून पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. तर दगडफेकीत काही जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार खबरदारी म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. परंतु, रात्री 2.30 वाजेपर्यंत मिरवणूक पुढे नेलेली नाही. यानंतर भाजप आमदार महेश चौघुले यांनी गणपती मंडळाला भेट दिली. गणेश भक्ताने रस्त्यातच बसून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांना जमावा कडून मारहाण झाल्याची घटना घडली. तणाव अजून वाढल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामध्ये काही नागरीक जखमी असून जमावाकडून झालेल्या दगडफेकीत एक पोलिस सुद्धा जखमी झाला आहे. या घटने नंतर शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे

भिवंडी येथील पद्मानगर भागातील गणेश मुर्ती कारखान्यातील 50 ते 60 मुर्तींची मोडतोड करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उघडकीस आला आहे. या घटनेनंतर भिवंडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस तसेच लोकप्रतिनिधींनी जमावाला शांत केल्यानंतर येथील तणाव निवळला. याप्रकरणी भिंवडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!